बोंडअळीच्या पैसे बाबत भाजयुमो पदाधिकारी यांची तहसीलदार सोबत चर्चा


  तेल्हारा :-सरकारने बोन्ड अळीचे पैसे पाठवून जवळपास एक महिन्याच्या कालावधी उलटून सुद्धा सदर रक्कर अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आले नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या बाबीला धरून युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे येत्या बुधवार पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल अशे आश्वासन यावेळी तहसीलदार संतोष येवलीकर यांनी दिले.यावेळी जिल्हा सरचिटणीस लखन राजनकार तालुका अध्यक्ष सतीश जयस्वाल भाजप शहर उपाध्यक्ष विशाल गजानन गायकवाड भुजबले तालुका सरचिटणीस सलीम शहा राहुल झापर्डे पंकज देशमुख शहर अध्यक्ष अक्षय पदवाड गणेश इंगोले सागर नेरकर राजा कुरेशी इत्यादी भाजयुमो चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post