मारवाडी महिला मिडटाऊन शाखा यवतमाळच्या वतीने सावन सिंजारा उत्सव संपन्न


यवतमाळ :-  दि. 11 ऑगस्ट रोजी स्थानिक केमिस्ट भवन यवतमाळ येथे मारवाडी महिला मिडटाऊन शाखा यवतमाळच्या वतीने सावन सिंजारा उत्सव मोठ्या उत्साहीत वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम गणेश वंदना करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत रिमझीम श्रावण महिन्याच्या गितांवर आधारीत गीत स्पर्धा, सोळा श्रृंगार गृप डान्स, रंगारंग हौजी, 1 मिनीट आदी खेळांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या महिलांनी या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेवून आनंद लुटला. माजी अध्यक्षांना महाराष्ट्रात पहिल्यांदाच कॅन्सर शिबीर व उत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कार विदर्भ प्रदेशाच्या वतीने प्राप्त झाला. तो पुरस्कार संस्थेच्या संस्थापिका सौ.पुनम जाजू, अध्यक्षा दिपा जाजू, सचिव ममता चांडक, कोषाध्यक्ष विमलेश मनक्षे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित महिलांना श्रावण मासानिमित्त मेहंदीचे कोन वितरीत करण्यात आले. गीत स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रुपाली बंग, द्वितीय अनु वर्मा, तृतीय मंजू जांगीड यांनी तर डान्स स्पर्धेमध्ये उषा धूत, संगीता चांडक, सुनीता बुब, वैशाली चांडक, मंजू जांगीड, रोशनी पनपालिया आदींनी सहभाग घेवून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारवाडी महिला मिडटाऊन शाखेच्या सर्व महिला प्रयत्नशील होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव ममता चांडक यांनी केले. तद्नंतर अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post