पद्मश्री कल्पना सरोज यांच्या कार्याची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाकडून जीवनपट निर्मितीस प्रारंभ


 जय रावत
मुर्तिजापूर :- सुप्रसिद्ध उद्योजक पद्मश्री  कल्पना सरोज यांच्या कार्याची दखल घेऊन  पंतप्रधान कार्यालयाकडून  त्यांच्या जीवनावर  इतरांना प्रेरणा मिळावी करिता  पंचेचाळीस मिनिटांचा जीवनपट निर्मिती  कार्यास  प्रारंभ  मुर्तीजापुर येथून  झाला आहे . याकरिता  दिल्लीचे डॉक्टर देवेंद्रसिंग  व त्यांची टीम आली होती. मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम रेपाडखेड या लहानशा खेड्यातून थेट युनायटेड नेशन मधील न्यूयॉर्कच्या राजनीतिक मुख्यालयापर्यंत पोहोचलेल्या म्हणजेच मुर्तिजापूर ते युनायटेड नेशन पर्यंतचा प्रवास करणाऱ्या पद्मश्री कल्पना सरोज  यांचा प्रवास कल्पना पलीकडचा म्हणावा लागेल. त्यांचे वडील माधवराव वारुळे पोलीस खात्यात होते .


कालांतरान घरची परिस्थिती खालावली .परंतु त्यांनी हिंमत आणि मनाचा निर्धार मात्र ढासळू दिला नाही. कणखरपणे व आपण कुणापेक्षाही कणभर कमी नाही हे स्वतःच्या मनावर बिंबवून त्या मार्गक्रमण करत राहिल्या .आज पद्मश्री सरोजताई  हजारो कोटी रुपयांच्या देश-विदेशा पर्यंत पसरलेल्या व्यवसायाच्या स्वामिनी आहेत .पण आपल्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली आहे .कुठेही श्रीमंतीचा आव नाही किंवा बडेजावपणा नाही .


अत्यंत साधेपणा जमिनीवर पाय असलेल्या पद्मश्री ताईंना विदर्भाचे विशेष आकर्षण आणि कमालीची ओढ आहे .परिस्थितीशी झगडणे    हेच शहाण पणाचे लक्षण मानतात. .आणि महिलांनी कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता परस्थिती सोबत झुंज देण्याची हिम्मत ठेवावी. त्यातूनच सुवर्णमयी पहाट उगवेल. जीवन समाप्त करण्याचा अघोरी प्रकार कोणीही न करता, एखाद्या कामात संपूर्ण समर्पण करून यश प्राप्त करणे ही जीवन जगण्याची खरी कला आहे. यातच समाधान आहे. मुलींनी देखील लहान लहान कामातून मोठे ध्येय गाठण्याचे स्वप्न पाहावे, व ते पूर्ण करावे. सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत. म्हणून उद्योग व्यवसायातून नोकऱ्या देणारे बना असा संदेश त्यांनी दैनिक दिव्य मराठी सोबत वार्तालाप करताना दिला. पद्मश्री कल्पनाताई त्यांचा जीवनप्रवास अकल्पित राहिलेला आहे. हाल अपेष्टा, गरिबीच्या लाटा झेलून यशाचे एवरेस्ट गाठले. त्यांना पद्मश्री ने सन्मानीत करण्यात आले यातच  त्यांचे कर्तुत्व समावल्याचे दिसून येते.     


                                             त्यांनी केलेल्या कार्याची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात येऊन आता त्याच्यावर जीवनपट निर्माण केल्या जात आहे. ग्राम सोनारी येथे दहा एकर चंदनाची शेती लागवड केली आहे . तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून त्यांनी येथे उद्योग उभारावा अशी गळ अनेकांनी त्यांना घातली . याची त्यांनी गंभीरपणे दखल घेऊन सकारात्मक आश्वासन दिले.मुर्तीजापुर पोलीस स्टेशनला कमान देखील देण्याचे त्यांनी कबूल केले आहे. विदर्भातील कन्या आपल्या कर्तुत्वाच्या सुगंधाने  पद्मश्री पुरस्कारावर नाव कोरते.

त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे जीवनावर पंतप्रधान कार्यालयाकडून  जीवनपट (डॉक्युमेंटरी) निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता मुर्तीजापूर तालुक्यातील त्यांचे मूळ गाव आरखेड तसेच  तालुक्यातील त्यांचे इतर कार्य यासोबतच पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय या ठिकाणी देखील शूटिंग करण्यात येऊन शुभारंभ करण्यात आला.यावेळी तहसीलदार राहुल तायडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र मंत्रालय सामाजिक, न्याय आणि विकास चे असोसिएट प्रोफेसर  आणि  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे  जागतिक दर्जाचे अत्याधुनिक म्युझियम  उभारणीसाठी कार्य केलेले डॉक्टर देवेंद्रसिंग ,उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे ,ठाणेदार दत्तात्रय आवारे, तसेच छगन खंडारे अकोला आणि पत्रकार विलास नसले यांची उपस्थिती होती.

                                                            अत्याधुनिक व जागतिक कीर्तीचे  आंतरराष्ट्रीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम  दिल्ली येथे उभारण्याकरता कार्य केलेले व जीवनपट निर्माण करण्याची धुरा सांभाळणारे डॉ. देवेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले की डॉक्युमेंटरी पूर्वी एक सुंदर  पुस्तक पद्मश्री कल्पनाताई यांच्या जीवनावर काढले जात असून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम देखील केले जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यिनी व इतरांना त्याबाबत माहिती मिळेल. सदर जीवनपट हा 'काटो से कालीन तक' या नावाने काढण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post