शासनाने धनगर समाजाला एस.टी.आरक्षण देण्याची लोहारा तालुका सकल धनगर समाज आरक्षण समितीची मागणी


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-शासनाने धनगर समाजाला एस.टी.आरक्षण देण्यात यावा,अशी मागणी लोहारा तालुका सकल धनगर समाज आरक्षण समितीच्यावतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि, धनगर एस.टी.आरक्षणा करीता ज्यांचे बलिदान झाले आहे.
त्यांना शासनाने 50 लाख रुपयाची मदत करावी,
त्यांच्या कुटुंबातील एकास शासकीय सेवेत समावुन घ्यावे,आरक्षणाच्या लढ्यातील धनगर व इतर समाजातील व्यक्तीवरील सर्व खोटे गुन्हे बिनशर्त मागे घ्यावेत,अशा विविध मागण्या निवेदनात केल्या आहेत.या निवेदनावर आरक्ष समितीचे अध्यक्ष  उमाकांत लांडगे,प्रताप घोडके,पोर्णिमा लांडगे,दगडु तिगाडे,रघुविर घोडके डॉ.हेमंत श्रीगीरे,डॉ.गुणवंत वाघमोडे,बलभिम विरुध्दे,राहुल विराेधे,पंडित परसे, आकाश विराेधे,विजय महानुर,नितीन वाघे,रामेश्वर वाघ,ज्ञानेश्वर परसे,पंडित चंद्रकांत शेंडगे,मारुती शेंडगे,अजय घोडके,तानाजी घोडके,मारुती बंडगर,
यांच्यासह समाज बांधवाच्या सह्या आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post