अतुल नवघरे
लाखपुरी :- मुर्तिजापुर तालुक्याती लाखपूरी येथील कबड्डीपटू धनंजय देशमुख यांचे गुरुवारी दुपारी वयाच्या ३५ व्या वर्षी आकस्मिक निधन झालं, शेतातून परत येताना त्यांच्या छातीत दुखायला लागलं तसेच डॉ.नवघरे यांनी त्यांना मुर्तिजापुर ला नेले असता त्यांची प्राणज्योत मावळली. रात्री पूर्णा नदीच्या काठी अंतिम संस्कार करण्यात आला यावेळी शोकसभा घेण्यात आली. जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने त्यांना नाना कुलट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.अमित कावरे शिवसेना तालुकाप्रमुख अप्पू तिडके, सरपंच दिनेशसिंह चव्हाण,भाजपा तालुका उपाध्यक्ष बबलू ढोक,पत्रकार संघटना उपाध्यक्ष अतुल नवघरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रवी राठी, शिक्षक संघटनेतर्फे धर्मेंद्र चव्हाण,भारीप चे नाना मेहेर,अर्चना विद्यालयातर्फे सतीशसिंह चव्हाण,पुरुषोत्तम डागा,नजाकत अली,सुरज कैथवास,गजेन्द्रसिंह चव्हाण,जामनिक,देशमुख परिवार राष्ट्रीय खेळाडू हर्षल कांबे,सागर राणे यांनी संवेदना व्यक्त केल्या. लक्षेश्वर संस्थानचे अध्यक्ष राजू दहापूते यांनी सामुदायिक श्रद्धांजली दिली. एक खेळाडू तरुण वयात गेल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. शासनाच्या वतीने या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली अंतिम संस्कार कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेकडो कबड्डी खेळाडू व गावातील लक्षेश्वर क्रिडा मंडळ,महाराणा प्रताप व्यायाम मंडळ,धम्मशिवली मंडळाचे खेळाडू व गावकरी उपस्थित होते.
