उमरगा येथील प्रा.युसुफ मुल्ला यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव इकबाल मुल्ला

लोहारा :-  उमरगा येथील 'मायक्रोकॉम' संस्थेचे संचालक प्रा.युसुफ मुल्ला यांचा नुकताच एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. कर्नाटक राज्यातील सिमोगा येथील नेहरु स्टेडियम येथे आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय प्युपिल्स ऑलिम्पिक स्पर्धा दि.17 ते 19 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या  कार्याक्रमात प्रा.युसुफ मुल्ला यांना मोयुली सोटोकॉन वर्ल्ड कराटे डो असोसिएशनचे संस्थापक प्रमुख पीइरेरे एफ.मोयुली (अमेरिका)यांच्या हस्ते 'पीओए नॅशनल अँवार्ड 2018  हा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.संगणक क्षेत्रात गेल्या 20 वर्षापासून उत्कृष्ठ कार्य व रोटरी क्लबच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याबद्ल प्रा.मुल्ला यांना गौरविण्यात आले.सुकी के.आनंथन (मलेशिया),मीडोंजा सोटोकॉन कराटे असोसिएशनचे अध्यक्ष डब्ल्यु.ए.एस.पी.जे. मीडोंजा(श्रीलंका),
नेपाळचे प्युपिल्स ऑलंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अरुण कारकी,गुबान देशाचे अगाया,ऑलंम्पिक स्पर्धचे संयोजक एस.एल.विनोद,प्युपिल्स ऑलंपिक असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे, सरचिटणीस मोहमंद रफी शेख,सायराभानु शेख,एम. अल्ताफ पाशा आदींच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह,
गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात आले.त्यांच्या या योगदानाबद्ल रोटरी,शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post