तीन दिवसाच्या संपामूळे अनेक कार्यालयात शुक शुकाट



  • सामान्य नागरिकांच्या कामात खोळंबा 

उमरखेड :- राज्यातील १९ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आज दि. ७ आगष्ट ते ९ आगष्ट या तिन दिवसाचे दरम्यान त्यांच्या  विविध मागण्या साठी सर्व कर्मचारी संपावर गेल्यामूळे तालूक्यातील अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट पसरला आहे.परीणामतः अनेक कामासाठी तालुक्यातील येणाऱ्या अनेकांची परवड होत आहे.
अंशदायी पेन्शन योजना बंद करून सरसकट सर्वानाच जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात यावा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्यात यावे, वर्ग ४ च्या पाल्यांना वारसा हक्काने शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, केंद्राप्रमाणे ५ दिवसाचा आठवडा करण्यात यावा, महागाई भत्याची थकबाकी त्वरीत अदा करावी, महिला कर्मचाऱ्यांना २ वर्षाची बाल संगोपन रजा मंजूर करण्यात यावी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचरांना किमान वेतन १० हजार रुपये देण्यात यावे, २८ आगष्ट २०१५ च्या शिक्षण विभागाचा संच मान्यता सबंधीचा शासन निर्णय रद्द करावा व अतीरीक्त ठरलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे १०० टक्के समायोजन करण्यात यावे या विविध मागण्यासाठी या तिन दिवसाच्या संपाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपामध्ये महसूल, कृषी, भूमिअभिलेख, जि.प. बांधकाम, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती, आरोग्य, उपकोषागार विभागातील तृतीय व चतूर्थ श्रेणी कर्मचारी सामिल झाले आहेत. येथील तहसिल कार्यालयासमोर दिपक चव्हाण, बि. आर. चौधरी, गौतम मुनेश्वर, अभिजीत गव्हाणकर , कृष्णा वासमवार, वाहन चालक राजू मस्के यांचे नेतृत्वात या संपाचे आयोजन करण्यात आले आहे.परिणामतः या संपामूळे शहरातील अनेक शासकीय व निम शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट पसरला असल्याने विविध कामासाठी अनेक कार्यालयात येणाऱ्यांची परवड होत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post