महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत दिव्यांग प्रवगातुन राज्यात दुसरा क्रमाक मिळवुन उत्तीर्ण झालेल्या मुस्तफा मुजावर याचा लोहारा तालुका दिव्यांग कर्मचारी व अधिकारी संघटना यांच्यावतीने सत्कार संपन्न


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील मोघा ( खु.) या छोट्याशा गावातील गरिब कुटुंबातील कुमार मुस्तफा महंमद मुजावर हा युवक अथक परिश्रमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात दिव्यांग प्रवर्गातून महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमाकांने उत्तीर्ण झाले आहे.याची विक्रीकर निरिक्षक या पदावर पुणे येथे नियुक्ती झाली आहे.याचा सत्कार  लोहारा तालुका दिव्यांग कर्मचारी व अधिकारी संघटना यांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष डी.जी.दंडगुले,प्रा.दतात्रय कोटरंगे,संतोष माळवदकर, बालाजी सोमवंशी,राम क्षिरसागर,संतोष साळूंके, मोहन शेवाळे( प्रभारी केंद्रप्रमुख),गजानन सुतार, हणमंत सितापुरे,अँड.सुनिल पवार,यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post