- प्रवासी खाजगीत वाहतूकीकङे वळू लागले
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने वार्षिक सवलत कार्ड योजना बंद केल्याने s.t .प्रवासी खाजगीत वाहतूकीकङे वळू लागले प्रवाशाकङुन मागणी होत असुन महामंडळाने वार्षिक सवलत कार्ड योजना पुन्हा सुरू करावी प्रवाशाकङुन मागणी होत असुन राज्य परिवहन महामंडळाकङुन सदर योजना कांही वर्षे चांगल्या पद्धतीने सुरू होती.प्रवाशाची वार्षिक सवलत कार्डला चांगली मागणी होती.याचा फायदा महामंडळाला चांगलाच होत होता कारण दररोज लांबचा प्रवास करताना प्रवाशांना 10% सवलत मिळत होती. खाजगी वाहतूक प्रवासी s t वळत होता.सदर वार्षिक सवलत कार्ड ची किंमत 200 भरून प्रवास करणाराला एक वर्ष सवलत कार्ड चा लाभ घेता येत होता.मात्र महामंडळाने वार्षिक सवलत कार्ड योजना बंद केल्याने प्रवाशाकङुन नाराजी व्यक्त केली जाते.ही सवलत कार्ड योजना का बंद केली याचे उत्तर अजून मिळालेले नाही.
याचे फायदे18 कि.मी.जास्त प्रवासासाठी त्या कार्ड धारकाला 10 % सवलत मिळत होती. त्यामुळे रोज लांबचा प्रवास करणार्याना 10%सवलतीत येणार्या भाङ्यात रुपयांच्या पटीत भाङे आकारले जात होते.यासाठी रा.प.महामंडळाच्या साध्या किंवा निमआराम बससाठी राज्यात किवा अंतर राज्य वाहतुकीसाठी सवलत कार्ड ग्राह्य धरले जात होते तसेच प्रवासामध्ये तिकीट घेताना प्रवास भाङ्यात सवलतीसाठी वाहकास दाखवून 10 %सवलत मिळत होती. यामुळे प्रवाशांना यांचा चांगलाच फायदा होता.महामंडळाकङे सुध्दा या कार्डमुळे प्रवासकरणार्याची संख्या वाढली होती.मात्र ही योजना बंद केल्याने प्रवाशाकङुन नाराजीचा सुर उमटत असुन महामंडळ प्रशासनाने याकङे लक्ष देवून ही योजना पुन्हा कार्य न्वित करावी म्हणजे प्रवासी पुन्हा एकदा म्हणतील वाट पाहीन पण s. t.ने जाईन.
