अकोला मार्गे जाणारी सचखंड एक्सप्रेस साप्ताहिक गाडी रद्द


नांदेड प्रतिनिधी–(स्वप्नाली वालकर) गाडी संख्या 12421 नांदेड येथून अमृतसर ला जाणारी  साप्ताहिक गाडी 25 जुलै आणि 01 ऑगस्ट रोजी रद्द 
फिरोझपूर  विभाग, उत्तर रेल्वे मध्ये अमृतसर रेल्वे स्थानकावर नॉन-इंटर लॉक वर्किंग आणि त्यापूर्वी ची तयारी करण्या करिता दिनांक 19 जुलै ते 31 जुलै दरम्यान ट्रफिक ब्लॉक घेण्यात आला आहे.
यामुळे अमृतसर आणि  नांदेड दरम्यान धावणारी साप्ताहिक रेल गाडी चार दिवस रद्द करण्यात आली आहे ती पुढील प्रमाणे

1) अमृतसर येथून सुटणारी गाडी संख्या 12422 अमृतसर-नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस मार्गे अकोला हि गाडी दिनांक 23 जुलै आणि 30 जुलै, 2018  रोजी रद्द करण्यात आली आहे.
2) याचा परिणाम म्हणून नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 12421 नांदेड ते अमृतसर साप्ताहिक एक्स्प्रेस मार्गे अकोला हि गाडी दिनांक 25 जुलै आणि 01 ऑगस्ट , 2018  रोजी रद्द करण्यात आली आहे.
नोट- गाडी संख्या 12715/12716 अमृतसर- नांदेड -अमृतसर सचखंड एक्स्प्रेस या दिवशी नियमित पणे  धावेल. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 
तसेच अंबाला विभाग, उत्तर रेल्वे मध्ये निलोखेरी स्थानकावर नॉन-इंटर लॉक वर्किंग आणि त्यापूर्वी ची तयारी करण्या करिता दिनांक 14 जुलै ते 15  जुलै रोजी ट्रफिक ब्लॉक घेण्यात आला आहे . यामुळे गाडी संख्या 12715 नांदेड अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आणि 22457 नांदेड ते अमृतसर साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 14 जुलै रोजी आदर्श रेल्वे स्टेशन ते पानीपत दरम्यान 90 मिनिटे उशिरा धावेल.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post