इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथील लोकमंगल माऊली या कारखान्याने शेतकरी वर्गाचे थकित बिल लवकरात लवकर द्यावे,या मागणी साठी संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका यांच्यावतीने साखर आयुक्त,साखर संकुल पुणे यांना निवेदन दिले आहे.फेब्रूवारी 2018 व मार्च 2018 या दरम्यान शेतकऱ्यानी जवळपास 2 ते 2.50 लाख मेट्रिक टन ऊस कारखान्याला दिला असून जवळपास परिसरातील 400 ते 500 शेतकऱ्यांचे 40 ते 50 कोटी रुपये कारख़ाना प्रशासनाने बाकी ठेवले आहेत. या संदर्भात वेळो वेळी निवेदने देवूनही अजूनही शेतकऱ्यांची पूर्ण बिले कारखान्याने काढली नाहीत. बिलाची मागणी करुन कारख़ाना बंद ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना 2000 रु हफ्ताची रक्कम 10 जुलै ही मुदत प्रशासनाने मागितली होती.पण अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.येत्या काही दिवसात पैसे जमा न झाल्यास शेतकरी बांधवना सोबत घेवून मोठे जनांदोलन उभरण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडने या निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी संभाजी ब्रिगेड उप प्रदेशाध्यक्ष अभिमन्यु पवार,संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका अध्यक्ष सुनील सालुंखे,संघटक दादा पाटील, संघटकप्रमुख श्रीहरी रसाळ,रावसाहेब सालुंखे,प्रवक्ता गोपाळ माने,तालुका उपाध्यक्ष धनराज बिराजदार, सहदेव गोरे,सचिन रनखांब,शेतकरी राम शिंदे, बलभीम रसाळ,रविंद्र रसाळ,ज्ञानेशर अरगड़े,पंढरी मूरटे,यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.
