दक्षिण मध्य रेल्वे ने मेल/एक्स्प्रेस रेल्वे गाड्या च्या समयपालना मध्ये 90 % उपलब्धता


नांदेड-{स्वप्नाली वालकर}दक्षिण मध्य रेल्वे ने मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या समय पालनात 90 % पर्यंत सफलता प्राप्त केली जो एक नवा कीर्तिमान आहे. मा. रेल्वे मंत्री श्री पियुष गोयल यांनी नुकतेच त्यांच्या सिकंदराबाद भेटी दरम्यान दक्षिण मध्य रेल्वे च्या अधिकाऱ्यांना रेल्वे गाड्या च्या समयपालनामध्ये सुधारणा करण्याचे आवाहन केले होते.

दक्षिण मध्य रेल्वे ने मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या समयपालनामध्ये 90% ध्येय सध्या केले तर संपूर्ण द.म.रे. क्षेत्र मध्ये नांदेड आणि गुंटूर विभागाने मेल / एक्स्प्रेस गाड्यांच्या समय पालनामध्ये याही पेक्षा सरस लक्ष प्राप्त केले. प्रवाशी सुविधे मध्ये हे एक महत्वाचे पावूल मानले जातेय. श्री  पियुष गोयल, मा. रेल्वे मंत्री यांनी दिनांक 15 जून 2018 रोजी इच्छा व्यक्त केली कि दक्षिण मध्य रेल्वे मेल/ एक्स्प्रेस गाड्यांच्या समय पालनामध्ये 90 % पर्यंत लक्ष प्राप्त करेल. त्यांच्या या शब्दांची प्रेरणा घेवूनच दक्षिण मध्य रेल्वे  च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या दौऱ्या नंतर अवघ्या 15 दिवसातच हे लक्ष प्राप्त केले.

श्री विनोद कुमार यादव, महाप्रबंधक, द.म.रे. यांनी सर्व सहा विभागांच्या व्यवस्थापकांना आणि परिचालन विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना हे लक्ष प्राप्त केल्या बाबत अभिनंदन केले. तसेच त्यांची हि इच्छा व्यक्त केली कि हि समय पालनात अशीच राहावी यात आणखी सुधारणा व्हावी आणि आणि समय पालाणते सोबतच सुरक्षे ला सर्वोच प्राधान्य देत राहावे.

दक्षिण मध्य रेल्वे ने समय पालना करिता जी बहुस्तरीय योजना आखली आहे ती योजना हे लक्ष प्राप्ती चे मुख्य कारण आहे असे श्री यादव म्हणाले. तसेच रेल पथ रखरखाव करिता रेल्वे चे इंजिनियर जे अहोरात्र मेहनत घेत आहेत यामुळे हि लक्ष प्राप्ती संभव झाली आहे. या करीतच रेल्वे पटरी च्या सुधारणे करिता जो ट्राफिक ब्लॉक घेतल्या जातो तो अशा वेळी घेण्यात येतोय जेंव्हा कमीत कमी गाड्या चालत असतील विशेषतः मेल/एक्स्प्रेस गाड्या.

तसेच जे खूप दिवस चालणारे ब्लॉक आहेत त्यांना लवकरात लवकर पूर्ण करण्याकरिता विविध आधुनिक उपकरणांची मदत घेतली जात आहे. तसेच या कार्यात सामील असलेल्या रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांना दिलेले काम वेळेत पूर्ण करण्याकरिता प्रोत्साहन दिले जात आहे असे श्री यादव यांनी कळविले.

श्री विनोद कुमार यादव, महाप्रबंधक  यांनी समयपालन ला मॉनीटर कण्याकरिता विविध स्तरांवर कार्यप्रणाली बनविली आहे. सर्व रेल्वे गाड्या समयपालन नुसार चाल्व्यात म्हणून महाव्यवस्थापक विविध विभागीय रेल्वे व्यावाथापक आणि परिचालन विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत विडीयो प्रणाली द्वारे नियमित बैठका घेत असतात.  अप्पर महाप्रबंधक रोज सकाळी विविध विभागीय अधिकारी यांच्या सोबत उशिरा चालणाऱ्या गाड्या विषयी माहिती घेतात आणि त्या गाड्या वेळेवर चालाव्यात म्हणून सूचना करतात.  ला

श्री विनोद कुमार यादव, महाप्रबंधक, दक्षिण मध्‍य रेलवे यांनी हे ध्येय निश्चित केले आहे कि दक्षिण मध्य रेल्वे मध्ये चालणाऱ्या सर्व गाड्या या वेळेवर चालाव्यात जेणेकरून दक्षिण मध्य रेल्वे समय पालनामध्ये संपूर्ण भारतीय रेल्वे मध्ये सर्वोच स्थान प्राप्त करू शकेल. या ध्येय निश्चिती करिता सर्व रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन श्री यादव यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post