इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनि :- धीमराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठवाड्यातील विशेषत:उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तांड्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा,उस्मानाबाद जिल्ह्यात 450-500 तांडे आहेत.तरी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी भारतीय बंजारा क्रांती दल पक्षाचे युवा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य व भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद जिल्हा अध्यक्ष उस्मानाबाद किशोर पवार करणार आहेत.
वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड यांच्याकडे करणार आहेत.व ग्रामीण विकास मंत्री माननीय पंकजाताई मुंडे येणाऱ्या 26 तारखेला मुंबई येथे जाऊन भेट घेणार आहेत.निधी उपलब्ध करून द्यावी व वाढदिवसाच्या शुभेच्छा जाऊन देणार आहेत.किशोर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार एका बैठकीत चर्चा करत होते की,250 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या बंजारा तांड्याचा विकास होण्यासाठी निधी आवश्यक आह
बंजारा तांड्यांच्या सर्वांगिण विकासाकरीता तसेच शिक्षण सुविधा,रस्ते,पाणी पुरवठा,विज पुरवठा, आरोग्य व इतर नागरी सुविधांसाठी आपल्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन द्यावा असे ते म्हणत होते.या सर्व कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन बंजारा तांड्यांचा सर्वांगिण विकास घडवूण आणावा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगत होते.दरम्यान,वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किशोर पवार व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी घेऊन जाणार आहेत. पदाधिकाऱ्यांनी भागवत कराड यांचा औरंगाबाद येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करणार आहेत.व निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करणार आहेत.
यावेळी भारतीय बंजारा क्रांती दल पक्षाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते.या बैठकीत आवर्जून राहणारे चंद्रकांत (भाऊ) राठोड भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद जिल्हा प्रभारी उस्मानाबाद व सेवा बचत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत,जय हिंद करिअर अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष मुंबई श्री प्रदिप (भाऊ) राठोड, व जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
