भारतीय बंजारा क्रांती दलाच्या उमरगा तालुका अध्यक्ष पदी किशन राठोड यांची निवड


इकबाल मुल्ला
  लोहारा/प्रतिनिधी :- भारतीय बंजारा क्रांती दलाच्या उमरगा तालुका अध्यक्ष पदी किशन हरिबा राठोड यांची निवड करण्यात आली आहे.संगटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अंकुश जाधव,राष्ट्रीय महासचिव शरदभाऊ राठोड यांनी हि निवड केली आहे.यावेळी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस किशोर पवार,महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सरस्वती ताई जाधव,शिवाजी राठोड,रणजित जाधव, मुळजतांड्याचे सरपंच मोहन चव्हान,सौ.मायताई, सौ.सौजर ताई,सौ.सपना राठोड,अमोल राठोड,सुभाष राठोड,आदेश चव्हाण,कु.प्रतिभा राठोड,राजकुमार राठोड,अजय राठोड,यांच्यासह  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते.सदर संघटनेच्या वतीने तांडा चलो आभियान अंकुश जाधव व शरद भाऊ राठोड राबवत असून प्रत्येक जिल्ह्यातील तांडण्यावर जाऊन समाजाच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात असून समाज प्रोबोदन व सर्वांगीण विकास होण्यासाठी कार्य चालू आहे सदेरील अभियान 2--महिने संबध महाराष्ट्र भर राबवला जात असून याची सुरुवात लातूर येथून करण्यात आली आहे.उमरगा-व उस्मानाबद जिल्ह्यात सुरु आहे.तरी अभियानात सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान अंकुश जाधव यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post