सह्याद्रि फाउंडेशन यांच्या वतीने खामसवाडी येथील ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांना मोफत मास्क वाटप


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सह्याद्रि फाउंडेशन उस्मानाबाद यांच्या वतीने तालुक्यातील खामसवाडी येथील ग्रामपंचायतच्या  स्वच्छता कर्मचाऱ्यांना श्वसनाचे आजार होऊ नयेत म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत,त्यांना मोफत *मास्क* वाटप करण्यात आले.व तसेच जगदंबा कन्या प्रशाला व जि.प.प्रशाला खामसवाडी या दोन्ही शाळेमधील एकुण 800 विद्यार्थ्यांना *चाईल्ड-लाईन उस्मानाबाद* या संस्थेद्वारे समाजातील अनाथ,बेवारस,हरवलेले,आजारी,लैंगिक छळ होत असलेले 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी *1098* या टोल फ्री नंबरची जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे मार्गदर्शक अशोक (बापू ) शेळके होते.


यावेळी प्रमुख म्हणुन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.
दापके देशमुख दिग्गज,सरपंच सौ.मनिषा कोळी,
 तवले,अमर शेळके,विकास विधाते,बाबासाहेब माने, पोपट शेळके,जगदंबा कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.आर.सावंत,जे.व्ही.केंद्रे,ए.व्ही.गर्जे,एस. डिकले,जि.प.प्रशाला मुख्याध्यापक रसाळ सर,राठोड सर,श्रीमती ए.ए.देवळे,संस्थेचे समन्वयक गजानन पाटील,अनिल जाधव,दादा कोर्के,अदि उपस्थित होते.


यावेळी डॉ.दापके देशमुख दिग्गज म्हणाले कि, समाजातील अशा निराधार मुलांसाठी *सह्याद्री फाउंडेशन्स व चाईल्ड-लाईन उस्मानाबाद* ही संस्था 24 तास मदत करण्यास कटीबद्ध आहे,असे सांगीतले.या कार्यक्रमास शिक्षक,शिक्षककेतर  कर्मचारी,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post