इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी ऑनलॉईन व नेटवर्कमुळे मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्यानेहि शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवुन पंतप्रधान राष्ट्रीय पिक विम्याचा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांनी महसुल व कृषी मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील व राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत यांच्याकडे प्रत्यक्ष भेटुन पाठपुरावा केला होता.
अखेर यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवुन शासनाने
*पंतप्रधान पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना मुदत 31 जुलै पर्यंत मुदतवाढ*
दिली आहे.यामुळे आ.सुजितसिंह ठाकुर यांचे शेतकऱ्याकडुन अभिनंदन करण्यात येत आहे.
