उमरगा तालुक्यातील आलूर शेतकर-यांचे पिक विमा न मिळाल्याने शेतकरी हैराण.

चेतन पवार
 उमरगा तालुका (प्रतिनिधी) :-उमरगा तालुक्यातील आलूर आणि  वरनाळवाडी येथील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाले नसून शेतकरी आर्थिक संकंटात सापडला आहे. येथील जवळपास १२०० शेतकरी  पीक विमा रकमेपोटी गेल्या वर्षी जवळपास १२लाख रुपयांचे पिक विमा भरले आहेत. सरकारकडून वारंवार वेगवेगळ्या सूचना मिळत असल्याने काही शेतकरी डिसीसी बँकेत तर काही शेतकरी ई सेवेत तर बरेच शेतकरी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत पिक विमा भरले. पिक विमा भरलेल्या शेतकर-यांचे एकूण रक्कम जवळपास १२ लाखाच्या घरात आहे, पिक विमा रक्कम मंजूर झाले असून आलूर आणि वरनाळवाडी मधील एकाही शेतकऱ्याला अध्याप पिक विम्याची रक्कम मिळाली नाही.
याबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी महेंद्रकर  यांना  विचारपूस केले असता त्यांच्याकडे अध्याप विम्याची रक्कम व त्याचे तपशील आले नसल्याचे सांगितले.परिसरातील इतर बँकेनी विमा वाटप करत असून या वर्षातील पीक विमा भरणा चालू आहे,परंतु विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकरी चालू विमा रक्कम भरू शकत नाही.
एकीकडे हातातील पैसा बी बियाणे व खत घेऊन पेरणी केलेली आहे, सध्या शेतकरी पुढील शेतातील कामासाठी आर्थिक संकटात असून वेळेवर पिक विमा मिळाले तर कर्जबाजारी होणार नाही.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वरिष्ठ अधिकारीनी लवकरात लवकर लक्ष घालून शेतकाऱ्याना पीक विमा वितरित करावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post