नूतन शाखाधिकारी महिंद्रकर यांचा सत्कार.


चेतन पवार
 उमरगा तालुका (प्रतिनिधी) :- उमरगा तालुक्यातील आलूर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील कर्मचारी नूतन शाखाधिकारी महिंद्रकर आर डि व रोखपाल स्वामी एस एस यांचा बँकेत सत्कार करण्यात आली. आलूर शाखेतील स्वामी एस एस यांची बदली नळदुर्ग येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत झाल्याने निरोप निमित्त त्यांचे सत्कार वरनाळवाडीचे उपसरपंच महादेव दुदगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पूर्वीचे शाखाधिकारी देशमाने यांची बदली तुरोरी शाखेत झाल्याने त्यांच्या जागेत आता नूतन शाखाधिकारी महिंद्रकर आर डि यांचा सत्कार सिद्धप्पा ब्याळीमुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भीमशा घुरघुरे, शांतमलय्या स्वामी, कंटप्पा ब्याळीमुळे, मयूर घुरघुरे, शिवशरण मरबे,अहमद सत्तार, राम गुरव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post