महिलांनी कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध घाबरून न जाता परखडपणे आवाज उठविला पाहिजे


विलास नसले
मूर्तिज़ापुर :- महिलांनी कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध घाबरून न जाता परखडपणे आवाज उठविला पाहिजे .अन्याय अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकविला पाहिजे .जेणेकरून महिलांवर महिलांच्या चूप बसण्यामुळे जो अत्याचार वाढत जातो त्याला कुठेतरी आळा बसेल. असे मत जननी--२ कार्यक्रमाच्या अध्यक्षीय विचार व्यकत करताना  मूर्तिजापूरच्या नगराध्यक्षा  मोनाली कमलाकर गावंडे यांनी व्यक्त केले.


जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून महिला व मुली यांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कायदेविषयक मार्गदर्शन मार्गदर्शन व प्रबोधन कार्यक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने मुर्तीजापुर पोलीस स्टेशनच्या वतीने जननी -2 कार्यक्रम येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित केला होता .

व्यासपीठावर तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार वैभव फरतडे, भारतीय ज्ञानपीठचे प्राचार्य विकास सावरकर, भाऊसाहेब खांडेकर, डीपीडीसी सदस्या नगरसेविका सरिता राहुल पाटील, नगरसेविका स्नेहा गजानन नाकट, ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे ,ठाणेदार भाऊराव घुगे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी तहसीलदार तायडे व सौ.नाकट यांनी विचार मांडले. 


यावेळी महिलांना स्वयं सुरक्षा व कायदेविषयक प्रबोधन करून जागृत करण्यासाठी अकोला येथील पोलिस पथकातील कर्मचाऱ्यांनी तयार केलेले शांताबाई हे नाट्य सादर करण्यात आले. या नाटयातून महिलांवर होणाऱ्या अनेक प्रकारचे अत्याचाररूपी खून वेळोवेळी महिलांच्या जीवावर उठतात याचे अत्यंत चांगल्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आले. यामध्ये गर्भपात, मुलगा हाच वंशाचा दिवा, मुलगा व मुलगी यांच्यामध्ये भेद- भाव ,सासु सुनेची भांडणे असे समाजातील अनिष्ट  चाली,रूढी याविषयी जनजागृती करण्यात आली .

या नाट्यात एकूण सोळा पुरुष व महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता .सदर नाटक निलेश घाडगे यांनी निर्मित केले असून शांताबाई ची भूमिका देखील त्यांनी साकारली. तर यामध्ये गौरी संगळे या चिमुरडीचा ही समावेश होता. समाजातील वेगवेगळ्या विषयांना याद्वारे वाचा फोडून जागृती करण्यात आली. आणि विद्यार्थिनी ,महिला व तरुणींना संदेश देऊन ग्रामीण भागातील महिलांना देखील जागृत करण्याचे आणि पोलिस विभाग त्यांच्या पाठीशी असल्याचे आवाहन करण्यात आले. महिलांवर अथवा मुलींवर जर अन्याय-अत्याचार होत असेल तर याची माहिती पोलीस विभागाला देण्यात यावी जेणेकरून माहिती देणाऱ्याचे नाव अत्यंत गोपनीय ठेवल्या जाईल .


याकरिता 1091 व 1098 या क्रमांकावर कळवावे .तसेच आयकोला या मोबाईल अँप ्द्वारे देखील तक्रार नोंदवता येऊ शकते असे आवाहन करण्यात आले. महिला कोठेही कमजोर नसून ती अबला नाही तर सबला आहे असे दाखवात जुडो ,मार्शल आर्ट ,स्वयम् संरक्षणाची माहिती, तलवारबाजी, लाठी काठी याचे प्रात्यक्षिक अकोला येथील पोलीस दलातील महिलांनी करून दाखवले आणि उपस्थित महिला व विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास जागृत करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी भारतीय ज्ञानपीठ. सेंटआन्स, व्यंकटेश बालाजी, मालाणी, मधुकरराव पवार, श्री गाडगे महाराज, आदर्श कन्या कनिष्ठ महाविद्यालय, नॅशनल उर्दू इत्यादी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक व शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी करिता पोलीस स्टेशनचे संतोष हंबर्डे ,संजय खंडारे , योगेश उमक  ,मनीष मालठाणे, अनिल टोपकर, प्रकाश शेगोकार, प्रदीप व्यवहारे महिला कर्मचारी जया वानखडे, प्रियंका धोटे, लतिका मैद व गुल्हाने यांनी सहकार्य केले संचालन ईब्राहीम अली सर यांनी केले तर आभार ठाणेदार आव्हाळे यांनी व्यक्त केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post