इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी ऑनलॉईन व नेटवर्कमुळे मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.
यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवुन पंतप्रधान राष्ट्रीय पिक विम्याचा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी,मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांनी महसुल व कृषी मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील व राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत यांच्याकडे प्रत्यक्ष भेटुन केली आहे.शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवुन शेतकऱ्यांसाठी अति महत्वाची मागणी केल्याने आ.सुजितसिंह ठाकुर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
