तेल्हारा :- युवा मोर्चासह नगरसेवकाने पालिकेला दिले बेशरम चे झाड सत्ताधारी भाजपला घरचा आहेर तर विरोधकांचे मौन
तेल्हारा दी. शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खाड्यांबाबत पालिकेत सत्ता असलेले सत्ताधारी व विरोधक हे दोन्हीही गंभीर नसल्याने याचा त्रास नागरिकांना होतं आहे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबाबत सत्ताधारी भाजपा नगरसेवक आक्रमक होत भाजयुमो पदाधिकाऱ्यांसह पालिकेत धडक देऊन बेशरम चे झाड भेट देऊन खड्यांबाबत 16जुलै ला निवेदन दिले
तेल्हारा शहरातील मुख्य रस्त्यावर गौतमा नदी पुलाजवळ व शहरातील खड्डे भुजविण्या समंधित नागरिकांकडून सतत मागणी होतं आहे पण नगरपालिका प्रशासन या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे पाऊसामुळे खड्डे दिसत नसल्यामुळे अनेक जण जखमी झाल्याचे निवेदनात नमूद आहे सादर खड्डे त्वरित भुजविण्यात मागणी करण्यात आली असून मागणी त्वरित मान्य न झाल्यास भाजपयुमो च्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे भाजपयुमो ने खड्ड्याची महापूजा करून नगर परिषदेचे लक्ष वेधले निवेदनावर नगरसेवक सुनील राठोड नगरसेविका पती गजानन गायकवाड यांच्या सह भाजपयुमो चे ता. अध्यक्ष सतीश जैस्वाल शहर अध्यक्ष अक्षय पदवाड जिल्हा सरचिटणीस लखन राजनकर राहुल झापर्डे सागर नेरकर रवि बाळगुळे शुभम भुजबले छोटू रुद्रकार सौरभ पाथ्रीकर गणेश रत्नपारखी भारत सोळंके सलीम शहा गणेश इंगोले सतीश कदम श्रीकृष्ण टाले रुपेश सोनटक्के सचिन जवंजाळ महादेव नवलकर अंकित गावत्रे मोहन पवार प्रकाश बोदळे सागर सुगंधी इत्यादी भाजपयुमो च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत
