लोहारा शहरातील विज वितरण कंपनीने सोलार प्रकल्प उभारणीच्या नावाखाली कार्यालयाच्या परिसरात वृक्ष तोड केली


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- ऐकीकड शासन 'एकच लक्ष्य तेरा कोटी वृक्ष'लागवडीचा उपक्रम हाती घेतला असताना लोहारा शहरातील वीज वितरण कंपनीने वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष करून सोलर प्रकल्प उभारणीच्या नावाखाली कार्यालयाच्या परिसरात असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली आहे.

        मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत लोहारा व सास्तूर येथे सोलर प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.या सोलर प्रकल्पातून एक ते दोन मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. महाजनको व मेढा यांच्या पुढाकारातून हा सोलर प्रकल्प साकारला जाणार आहे.लोहारा शहरातील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालय परिसरात हा सोलर प्रकल्प उभारण्यात येत आहे.


हा परिसर जवळपास पाच ऐक्करचा असून त्या ठिकाणी विविध जातीची मोठ मोठी वृक्ष आहेत.या परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येत असल्याने वीज वितरण कंपनीने वृक्षतोड सुरू केली आहे.परंतु ज्या ठिकाणी प्रकल्प उभा करावयाचा आहे. त्या ठिकाणची वृक्ष तोड करणे अपेक्षित असताना ज्यांचा अडसर ठरत नाही,अशा ठिकाणची जवळपास आठ ते दहा वृक्षांची कत्तल केली आहे.

वीज वितरण कंपनीने वनविभागाकडून वृक्षतोड करण्याची रितसर परवाणगी घेतली आहे.परंतु जेवढे झाडे तोडण्यात आली आहेत,त्याच्या दहापट वृक्षलागवड करावी तसेच वृक्षलागवडीची प्रक्रिया तत्काळ सुरू करून त्यांचे संवर्धन करण्याची अट घालून वनविभागाने वृक्षतोडीला परवाणगी दिली आहे.मात्र वीज वितरण कंपनीने वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखावा यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयात वृक्षलागवड करण्याबाबत राज्य सरकार दरवर्षी आग्रही असते.


परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसरात मागील पाच ते सहा वर्षापासून वृक्षलागवड केलेली नाही.त्यामुळे नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
     सोलर प्रकल्प शहरात होत आहे.ही चांगली बाब आहे.मात्र प्रकल्प उभारणीसाठी अनावश्यक ठिकाणची वृक्षतोड करणे उचित नाही.वृक्षतोड करण्यापूर्वी वृक्षलागवडीकडे वीज वितरण कंपनीने लक्ष देेणे गरजेचे होते.मात्र ते होताना दिसत नाही.
श्रीनिवास फुलसुंदर,नगरसेवक तथा निसर्ग संवर्धन प्रेमी,लोहारा 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post