कारगिल युद्ध विजयनिमित्त मोटारसायकल रॅलीचे आयोजन.




अकोला :- कारगिल युद्ध हे भारत वपाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते.26 जुलै 1999 रोजी या युद्धात भारताला विजय मिळाला,त्याअनुषंगाने 26 जुलै हा संपूर्ण देशात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यापृष्ठभूमीवर अकोल्यातील माजी नगराध्यक्ष तथा अकोला महानगरपालिका नगरसेवक हरिषभाई आलिमचंदाणी संचालक टिव्हीएस डेल्टा ,नेहरू पार्क चौक अकोला यांच्या वतीने विजय दिवासनिमित्त मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे

कारगिल युद्ध हे जम्मू आणि कश्मीर राज्यातील कारगील जिल्ह्यात मे 1999 साली झाले होते.या युद्धाच्या विजयाने भारतातील पाकिस्तानने घुसखोरी करीत ज्या प्रदेशावर कब्जा केला होता ,तो परत मिळविताआला. या युद्धात भारताच्या वतीने 30 हजार सैनिकांनी सहभाग घेतला होता, या युद्धामध्ये भारतीय सैनिक दलायचे 527 जवान शहीद झाले होते तर,1हजार 363 जवान गँभीर रित्या जखमी झाले 

होते.तर हे युध्द लढत असताना भारतीय 1 सैनिकांला पाकिस्तानने युद्ध कैदी केले. या युद्धात पाकिस्तानचे 400 जवान शाहीद झाले असून पाकिस्तानचे 8 सैनिक युद्ध कैदी करण्यात भारताला यश आलं होतं. यायुद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. 

तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले. 

इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले.हे युद्ध तत्कालीन भारतीय सैनिक दलाचे प्रमुख जनरल वेद प्रकाश मलिकयांच्या कार्यकाळात झाले. पाकिस्तान ने कब्जा केलेली ठाणी कारगिल व दासपरिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहे. 

यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अन्ववस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होते. परंतु भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. म्हणूनच, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली. परिणामी, काही महिन्यांतच (ऑक्टोबर, इ.स. १९९९ मध्ये) पाकिस्तानात जनरल परवेज मुशरफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post