नगर परिषदेच्या सर सैय्यद अहमद खान वरिष्ठ प्राथमिक शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न


रिज़वान सिद्दीकी
मूर्तिज़ापुर :-  झाडे लावा झाडे जागवा व पर्यावरणाच्या संतुलन राखण्याकरिता शासनाच्या वतीने वृक्ष लागवडीचे लक्ष प्रत्येक विभागाला देण्यात आलेले आहे या अनुषंगाने स्थानिक जुने वस्तीतील सर सय्यद अहमद उर्दू शाळा या ठिकाणी नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला नगर परिषदेच्या उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती आलिया तबस्सुम नासिरुद्दीन व व शिक्षण सभापती सुनिल पवार हे शाळेच्या तपासणी करता आलेली असताना सदर कार्यक्रम पार पडला नगरपरिषद चे दोन्ही पदाधिकारी हे शाळेतील शिक्षण प्रणालीच्या बाबत माहिती घेण्याकरता येथे आले होते शाळेतील शिक्षण प्रणाली व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत दोन्ही पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला शाळेचे मुख्याध्यापक नासिर हुसेन खान यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यां चे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर शालेय प्रांगणातच वृक्षारोपण करण्यात आले यावेळेस नगरपरिषद चे शालेय प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे सुभाष महेसणे शिक्षण विभागातील लिपिक वसनकर सामाजिक कार्यकर्ते रवी राठी नासिरुद्दीन ठेकेदार शाळेचे मुख्याध्यापक नासिर हुसेन खान सय्यद बशारत अली मुरसलीनोद्दीन फरहीन फातिमा शमशुन निसा राजेश जोशी इंदिरा गांधी न पा माध्यमिक मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक जयदीप सोनखास कर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post