भाजयुमो तेल्हारा शहर आक्रमक, कोणताही विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहता कामा नये


तेल्हारा(प्रतिनिधी)- आज भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने डॉ. गो.खे.महाविद्यालय गाडेगाव(तेल्हारा)येथे प्रथम वर्ष  विद्यार्थी प्रवेश वाढिव जागासाठी निवेदन देण्यात आले.
तेल्हारा तालुक्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहता कामा नये.सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रवेश देण्यात यावा.याबाबत भारतीय जनता युवा मोर्चा तेल्हारा शहरच्य वतीने निवेदन देण्यात आले.यामध्ये ११ वी व पदवीच्या प्रथम वर्षाच्या जागा वाढवण्यात याव्या जेणेकरून कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही.बऱ्याच विद्यार्थ्यांना अद्याप पर्यन्त प्रवेश मिळाला नसून त्यांना प्रवेश मिळावा यासाठी जागा वाढवणे गरजेजे आहे.तरी महाविद्यालय प्रशासनाणे येत्या  दहा दिवसांत जागा वाढवल्या नाही तर भाजयुमो तर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा आक्रमक भूमिका स्पष्ट केली.यावेळी निवेदन देते वेळी भाजयुमो.जिल्हा सरचिटनिस लखन राजकर. तालुका अध्यक्ष. सतिष जयस्वाल.शहर अध्यक्ष अक्षय पदवाड. राहुल झापर्डे.सागर नेरकर.गणेश रत्नपारखी. सलिम
शाहा. सचिन तायडे भुषन सोलंके सैरभ विखे सचिन भागिनकार मनिष डामरे. दिपक मोडक.सागर.सुगंधी.अश्विन म्हसके. निलेश खेट्टे.आकाश पिवाल.लखन खंडारे. प्रतिक पाथ्रीकर.प्रतिक कुलट.अक्षय भुजबले.राजु.शाहा.वैभव सरोदे.ईत्यादी कार्यकर्ता ऊपस्तित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post