मुर्तीजापुर शहराचा मुख्य रस्ता गेला खड्ड्यात


  • नागरिकांसह विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास 
  • रस्ता  कुठेही दिसत नाही दिसतात ते फक्त खड्डेच खड्डे  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 

विलास नसले 
मूर्तिज़ापुर :- छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोरारजी चौकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व सौंदरीकरणाचे काम नागपूरच्या एका कंपनीने घेतले आहे.सदर कामअत्यंत संथगतीने केले जात आहे. त्यामुळे अधिकारी व  लोकप्रतिनिधींच्या  भूमिकेबाबत विविध चर्चा होत आहे. 

मुर्तिजापुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोरारजी चौक पर्यंत असलेला एकमेव मुख्य मार्ग खड्डयानी व्यापला असून रस्ता कुठेही दिसत नाही. दिसतात ते फक्त खड्डे. त्यामुळे रस्ता गेला खड्ड्यात अशी म्हणण्याची वेळ मुर्तीजापुरकरांवर आली असून शहरवासीयांवर त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. 


मुर्तीजापुर शहराच्या मुख्य मार्गाचे रुंदीकरण आणि सौंदरी करणाचे काम सुरू असून नागपूर येथील कंपनी हे काम करत आहे. परंतु सदर कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. या विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षितपणामुळे रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. तर दुसरीकडे   शहरावाशी  तसेच विद्यार्थ्यांना येण्या- जाण्या करिता जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे खड्डयांमध्ये अदृश्य झाला असून या गंभीर बाबीकडे काही दिवसापूर्वी अपघात होऊन एका निरपराध मुलीला आपला हात गमावण्याची वेळ आल्यानंतर देखील झोपेत  असलेल्यांची झोप उडालेली नाही .त्यामुळे शहरातील जनता तीव्र संताप व्यक्त करत आहे.


 या रस्त्यावरून ऑटो रिक्षा ,मोटर सायकल, चारचाकी वाहन , सायकलने   तर सोडा  पायी चालणे देखील कठीण झाले आहे. दमदार पाऊस सुरू असून जागोजागी, पावलोपावली असलेल्या खडुयामधे पाणी भरत असल्याने वाहन जातांना-येतांना पायी चालणारे अथवा सायकल मोटरसायकल वर जाणारे यांच्या अंगावर घाण पाणी उडत असून या खड्ड्यांमुळे केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर मागे एका विद्यार्थिनीचा अपघात झाल्यानंतर जड वाहनांना प्रवेश बंदी केलेली असली तरी ती फक्त नावापुरती आहे .   


पोलीस विभाग सुस्तपणे आपलं काम करण्यात दंग असून फक्त प्रवेश बंद बोर्ड लावून हात झटकून शहर पोलीस स्टेशन मोकळे झाल्याचे चित्र या मार्गावर जड वाहने अद्यापही जाणे-येणे  करत असल्याने दिसून येत आहे.  26 कोटी चा प्रकल्प असलेल्या 80 फुटी या रस्त्याचे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोरारजी चौक पर्यंत रुंदीकरण व संदरी करण्याचे 80 फूट रस्त्याचे काम नागपूर येथील एका कंपनीला देण्यात आले आहे परंतु सदर कंपनीही नावापुरती असल्याचे शहरात म्हटल्या जात आहे. 

या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून काही धनदांडग्यांचे अतिक्रमण वाचविण्यासाठीच अशाप्रकारे काम रेंगाळत सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. 80 फुटी रस्त्याचे सौंदर्यीकरण व रुंदीकरण कामाकरिता 15 महिन्याचा कालावधी हा न पटणारा असून एकीकडे शासन विकास कामे लवकरात लवकर करण्यावर भर देत असताना एवढा मोठा कालावधी देण्यामागील कारण काय ?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या रस्त्यावर उपजिल्हा रुग्णालय, पोलीस स्टेशन ,तहसील कार्यालय, बँक ,शाळा, कॉलेज, तहसील कार्यालय, पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी कार्यालय, क्रीडा कार्यालय, न्यायालय असून  जाण्याकरिता एकमेव रस्ता असल्याने प्रचंड वर्दळ असते. त्यातच शाळेच्या विद्यार्थ्यांची देखील मोठी गर्दी शाळा सुटल्यानंतर व शाळा भरताना या रस्त्यावर दिसून येते. 

जागोजागी पडलेले खड्डे हे अपघातास निमंत्रण देत असून आणखी एखादी अप्रिय घटना घडू शकते. त्यामुळे  बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी तात्काळ खड्डे  बुजविण्याचे काम सुरु करणे गरजेचे आहे. अन्यथा काही सामाजिक संघटना आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात असल्याचे वृत्त आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post