इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- आषाढी एकादशी निमित्त लोहारा तालुक्यातील माकणी येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज यांच्या पादुकांची दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले.यामुळे गावाला धाकटे पंढरपुरचे स्वरुप प्राप्त झाले होते.यावेळी गावातुन वारकऱ्यांची भव्य दिंडी काढण्यात आली.या दिंडीत महिला व बाल वारकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.दर्शनासाठी भाविकांनी सकाळ पासुन गर्दी होती.माकणी तेरणा नदीच्या काठावर श्री शिरोमणी मारुती महाराज यांचे 21 एकर जागेत भव्य मंदिर आहे.या मंदिरात दर्शन घेण्यासाठी नारंगवाडी,माकणी,कानेगाव,मातोळा,भातागळी,नारंगवाडी,हासलगण,सास्तुर,पेठसांगवी,अदि भागातील भाविकांनी दर्शन घेतले.यामुळे मंदिर भाविकांनी फुलुन गेले होते.
