इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील हायस्कुल लोहारा येथील शिक्षकांनी आषाढी एकादशी निमित्त तालुक्यातील तिर्थक्षेत्र असणार्याकानेगाव येथिल संतशिरोमणी मारुती महाराज मंदिराकडे विद्यार्थ्याची पायी दिंडी काढली.यामध्ये 250 पेक्षा अधिक विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.यानिमित्त विद्यार्थ्यांना फराळीचे केळी वाटप करण्यात आल्या यावेळी सहदेव काडगावे सर,दिपक प्रकाश रोडगे,संभाजी सुरवसे, नाना पाटील,राजपाल वाघमारे,प्रविण संगशेट्टी,मनोज बादुले,प्रकाश तोडकरी,विरेश स्वामी,आदी उपस्थीत होते.
