इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील सौ.ज्योतिताई शत्रुघ्न साळुंके यांची तालुका महिला राष्ट्रीय काँग्रेस आय पक्षाच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.सौ.ज्योतीताई साळुंके यांना नियुक्तीपत्र माजी
राज्यमंत्री कॉग्रेसचे मुख्य प्रतोद आ.बस्वराज पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, शत्रुघ्न उर्फ आबासाहेब साळुंके, उपस्थित होते.
या नियुकिती पत्रात म्हटले आहे कि,महिला कॉग्रेस कमिटीच्या लोहारा तालुका अध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली आहे.आपल्या निवडीबध्दल हार्दिक अभिनंदन.
आखिल भारतीय महिला कॉग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती शोभाजी ओझा यांच्या नेतृत्वाखाली ल सरचिटणीस अ.भा.कॉ.क.व प्रभारी महाराष्ट्र कु.नेटा डिसुझा,महाराष्ट्र प्रदेश महिला कॉग्रेस अध्यक्षा चारुलताजी टोकस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पक्षाचे काम सक्षमपणे कराल असा विश्वास आहे.
असे नियुक्तीपत्रात उल्लेख केला आहे.या नियुक्तीपत्रावर महिला कॉग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा डॉ.
राजलक्ष्मी गायकवाड यांची सही आहे.
या निवडीबध्दल ज्योतीताई साळुंके यांचे तालुक्यातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
