इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने 11 हजार वृक्षाचे वितरण व वृक्ष लागवड कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी आऱ व्ही़ गमे यांच्या हस्ते दि.20 जुलै रोजी मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला़.
पीकविमा भरणा मोहिमेच्या जनजागृतीसाठी उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथे दि.20 जुलै रोजी जिल्ह्यातील पहिला शेतकरी मेळावा घेण्यात आला़.यावेळी 11 हजार वृक्षाचे वितरण व लागवड कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी आऱ.व्ही़.गमे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला़.तसेच ग्रामपंचायतच्या आपलं सरकारमधील पीकविमा भरणा केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले़.यावेळी प्रमुख म्हणुन जिल्हा कृषी अधीक्षक घाडगे,विभागीय वन अधीक्षक सातेलीकर,मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे,वन विभागाचे उपसंचालक ए़.व्ही़.बेडके, विभागीय वन अधिकारी पवार, तहसिलदार सुजित नरहरे,तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश देवगिरे, दलितमित्र पांडूरंग कठारे,सोपान कोल्हे,सरपंच प्रशांत रणदिवे,उपसरपंच भाग्यश्री देवगिरे,ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील,सुजित बाकले,ओडीएसफ ॲग्रो प्रोड्यसूर कंपनीचे एमडी अमोल रणदिवे,लिंबराज मसे,सुधाकर देवगिरे,अदि उपस्थित होते.या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
