तेल्हारा ता प्रतिनिधी :- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 20 जुलै रोजी शिवसेना शहराच्या वतीने भगवा सप्ताह आयोजन करण्यात आले आहे यामध्ये तेल्हारा शहरातील सर्व शाखांचे उदघाटन करण्यात येणार आहे .
भगवा सप्ताह शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि.20 जुलै रोजी शिवसेना शहराचा वतीने वॉर्ड वाइस शाखांचे उदघाटन करण्याचे आयोजन शिवसेना शहराच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आ.गोपिकीशनजी बाजोरिया सहसंपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर जिल्हाप्रमुख नितीनबाप्पू देशमुख माजी आमदार संजयजी गावंडे अकोट तेल्हारा संपर्कप्रमुख भास्करजी ठाकूर उपजिल्हाप्रमुख दिलीपभाऊ बोचे तालुकाप्रमूख विजय पाटील मोहोड प्रामुख्याने उपस्थित राहतील 20 जुलै रोजी दुपारी 1 वाजता शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्री लटियाल भवानी प्रतिष्ठाण तेल्हारा येथे शिवसेना तेल्हारा शहराचा व तालुक्याच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व समस्त शिवसैनिकांनी उपस्थित राहावे अशे आहावण शिवसेना शहराच्या वतीने करण्यात आले आहे अशे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव यांनी कळविले आहे.
