लोहारा शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते हाजी बाबा शेख यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम घेवुन साजरा


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते हाजी बाबा मस्तानसाब शेख यांचा वाढदिवस शहरात विविध सामाजिक कार्यक्रम घेवुन उत्साहात साजरा करण्यात आला.
या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरातील जि.प.के.प्रा.
शाळेत व पोलीस ठाण्यात मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.व तसेच नविन वस्ती जि.प.
शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी हाजी बाबा शेख यांचा भाजप व विविध सामाजीक संघटना व मित्रपरिवारांच्यावतीने व शाळेच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, पो.नि.सर्जेराव भंडारे,सहाय्यक पो.नि.गंगाधर दराडे, कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक राजेंद्र पाटील,भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,मुख्याध्यापक मधुकर रोडगे,
सह शिक्षक सुरेश वाघमोडे,मुख्याध्यापक बी.डी. बादुले,सहशिक्षक एस.ए.माकणीकर,एच.एच.वडदोडे,
पं.स.सदस्य वामन डावरे,भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस नेताजी शिंदे,प्रशांत काळे,कल्याण ढगे,  किसान मोर्चा आघाडी तालुकाध्यक्ष सुनील सुर्यवंशी, भाजप तालुका उपाध्यक्ष सुभाष गिरी,भाजप शहराध्यक्ष अशोक तिगाडे,राजेंद्र कदम,परमेश्वर कदम,अशोक पाटील,यांच्यासह भाजपाचे  पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post