आषाढी एकादशी म्हंटले की;डोळ्यांसमोर येते ;ती पंढरपूरची वारी!


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- वर्षभरातील 24 एकादशीमध्ये या एकादशी चे विशेष महत्व या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते.या एकादशीचे महत्व विद्यार्थ्यांच्या बालमनावर रुजविण्याच्या हेतूने उमरगा शहरातील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर ची आषाढी एकादशी निमित्याने दिंडीचे आयोजन मुख्याद्यापक दिगंबर कुलकर्णी,हिरानाथ सगर,राकेश कुमार,प्रशांत जोशी,गणपत देवकर यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली होती
   यावेळी मुख्याद्यापक कुलकर्णी म्हणाले की, आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. परस्परांवर प्रेम करणे;प्राणीमात्र,अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो.विद्यार्थ्यांस संताची ओळख व्हावी आपल्या देशाची परंपरा समजावी या हेतूने श्री श्री रविशंकर विद्यामंदिर उमरगा ने या दिंडी चे आयोजन केले आहे.असे सांगीतले.
            खांद्यावर भगवी पताका,कपाळी गोपी चंदनाचा टिळा हाती टाळावीळा,गळ्यात तुळशीची माळ,मुखी विठुनामाचा गजर ग्यानबा तुकारामचा जयघोष,माऊली माऊली म्हणत ओथंबलेले स्वर, भारूड,अभंग,विठूनामाचा गजर करणारे विद्यार्थी समतेची पताका घेऊन एकतेची दिंडी घेऊन निघालेले दिसून येते होते.श्री श्री रविशंकर चे विद्यार्थी हे पाहून सारा परिसर भक्तीमय झाला होता.टाळ मर्दअंग याच्या तालावर धुंद हून विद्यार्थी नाचत होती. विद्यार्थ्यानी महाराष्ट्रीयन पोशाख घातला होता.तर मुलींनी नऊवारी ईरकल साडी असा पोशाख परिधान केला होता.मुलानी झाडे वाचवा झाडे जगवा तसेच भ्रूण हत्या थांबवा,कापडी पिशव्या घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी हा संदेश दिला.यावेळी शिवाजी चौकात श्री श्री रविशंकर विद्यालयाच्या निघालेल्या दिंडीवर पुष्पवर्शटी करण्यात आली 
 दिंडी यशस्वी करण्यासाठी सुधाकर जाधव,कला शिक्षक सुधाकर महामुनी,संगीत शिक्षक दर्शन सुरवसे, तबलावादक संतोष हर्के,उमेश खमीतकर,प्रीती इंगळे, सुरेखा सगर,बालिका हूलपले,वसुधा इंगळे,लक्ष्मी बिराजदार,स्नेहल टीकांबरे,शीतल माने,श्रीकांत मेंढे,रूपा पाटील,अदिनी परिश्रम घेतले.
दिंडीची सुरुवात रविशंकर विद्यालयापासून आरोग्य नगरी,महादेव मंदिर,विठल मंदिर ते शिवाजी चौकातून राष्ट्रीय महामार्ग ते शेवटी विद्यालयात समारोप करण्यात आला.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post