- बसव प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे यांचे अनोखे उपक्रम..
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाचा 15 डिसेंबर 2017 पर्यंत खड्डा मुक्त महाराष्ट्र च्या आदेशाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली हे स्पस्ट झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पूराणे यांनी नवीन शक्कल लढवत उमरगा-लोहारा तालुका खड्डा मुक्त करण्यासाठी "खड्डा दाखवा,बक्षीस मिळवा" सेल्फी विथ खड्डा हे अभियान चालू केली आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चांगल्या क्रांती घडू शकतात आणि हे अनेक वेळा पूराणे यांनी सिद्ध केले आहे.त्यातलाच हा एक भाग म्हणजे खड्डा दाखवा आणि बक्षीस मिळवा.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 18 ते 30 वयोगटातील युवकांना आवाहान करण्यात आले आहे आणि त्याबरोरबर त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रथम पारितोषिक 2100 रु,व द्वितीय पारितोषिक 1100 रु,व तृतीय पारितोषिक 501रु व उत्तेर्जनात 3 पारितोषिक 101 रु व प्रत्येकी सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.स्पर्धा 13 जुलै 2018 पासून ते 1 ऑगस्ट 2018 पर्यंत चालू राहील.
स्पर्धकांनी 1 ऑगस्ट 2018 पर्यंत आपल्या भागातील रस्त्यावरील खड्ड्या सोबत सेल्फी घेऊन पाठवण्याचे आवाहान सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे यांनी केले आहे.
जन आंदोलनाचा पायंडा मजबूत करण्यासाठी आणि आपल्या परिसराचा विकास घडवून आणण्यासाठी जर प्रशासन बेजबाबदार पणे वागत असेल तर त्यांना थारेवर आणण्यासाठी जन आंदोलन हे महत्वाचे कार्य आहे आणि हे कार्य व धाडस युवकांच्या अंगी यावे यासाठी आमचं हे प्रयत्न असून,आमच्या या अभियाना मुळे तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्याचे धाबे जरूर दणाणतील आणि कामाला लागतील हेच या उपक्रमाच ध्येय आसून खड्डे मुक्त उमरगा तालुका हे अभियान नक्कीच यशस्वी होईल. आणि युवकांना जन आंदोलनासाठी प्रोत्साहन ही मिळेल.युवकांनी दिलेली माहितीवरून प्रशासनाला जाब विचारले जाईल.तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी पोहचणे अवघड असले तरी या स्पर्धेच्या माध्यमातून तालुक्यातील रस्त्याची दशा याची माहिती मिळण्यास नक्कीच मदत होईल.असे रामलिंग पुराणे यांनी सांगीतले.
