कारंजा : सलीम तेली यांचा तत्कालीन थानेदार नंदकुमार काळे यांच्या सह इतर तीन विरुद्ध अब्रू नुकसान भरपाई चा दावा २०१३ वर्षी कारंजा येथील पोलीस ठाण्यात ठाणेदार पदी कार्यरत असताना नंदकुमार काळे व ए. एस. आय. सुभाष जाधव यांनी मो. सलीम तेली व मो. रिज़वान यांच्या विरूद्ध कट रचून खोट्या प्रकरणात गुन्हे दाखल केले त्यामुळे त्यांची समाजात बदनामी होवून प्रतिमा मलीन झाली तसेच स्वतः व संपुर्ण कुटुंबाला भयंकर मानसिक त्रास सहन करावा लागला व अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले
मानसिक व शारीरिक त्रास तसेच झालेल्या बदनामी बद्दल सलीम तेली यांनी विधमान दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) मंगरुळपीर यांच्या न्यायालयात तत्कालीन पोलीस निरीक्षक नंदकुमार काळे , ए. एस. आय. सुभाष जाधव , तत्कालीन पोलीस अधीक्षक व तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या विरुद्ध अॅड. टी. ए. खान यांच्या मार्फत पाच लाख रुपये अब्रू नुकसान भरपाई चा दावा केला आहे
