इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- कोथळी ता.उमरगा अंतर्गत कोथळी ते राज्य सरहद्दरस्ता निकृष्ट दर्जाचे झाले असुन,याची चौकशी करुन सबंधीत ठेकेदार सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरगा यांच्यावर कार्यवाही करावी,अशी मागणी मुरुम बसव प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सामाजीक कार्यकर्ते रामलिंग पुराणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि,सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबाद यांच्या मार्फत जिल्हा वार्षिक नियोजन सन 2015 — 16 अंतर्गत कोथळी (ता.उमरगा) ते राज्य सरहद्द रस्ता की.मी.0/300 ते 2/00 या अंतरासाठी 56 लक्ष 49 हजार रुपयांचे काम करण्यात आले होते.आणि त्या कामाचे उदघाटन दि. 25.05.2017 रोजी करण्यात आले होते.हा रस्ता केवळ 1700 ते 1800 मीटर साठी 56 लाख 49 हजार रुपये वापरुनही संबधित ठेकेदार व उपविभागीय अभियंता उमरगा यांच्या संगनमताने काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येते, कारण केवळ एक वर्ष उलटून गेले आणि त्या रस्त्याचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे रस्ता पूर्ण उकलत आहे, दुरुस्ती कालावधी असूनही संबधित ठेकेदार अद्याप रस्ता दुरुस्ती केला नाही.
संबधित कामाचा उच्चस्तरीय चौकशी समिती नेमुण 56 लाख 49 हजार रुपयांचा काम निकृष्ट दर्जा करून शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराचे परवाना तात्काळ रद्द करावे व तसेच उपविभागीय अभियंता उमरगा यांना तात्काळ निलंबित करावे अन्यथा बसव प्रतिष्ठाण च्या वतीने आंदोलन छेडण्याचा ईशारा निवेदनात दिला आहे.