बनावट नोटा प्रकरणी गुजरात पोलिसांनी मूर्तिजापूर येथील एकास केले जेरबंद



मूर्तिजापूरच्या नगरपरिषद घरकुल परिसरातील घटना मूर्तिजापूर येथील नगर परिषद  घरकुल परिसरात गुजरात पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने मुर्तीजापुर पोलिसांच्या मदतीने बनावट नोटा प्रकरणी एका आरोपीस अटक केल्याने व त्याच्या जवळून रंगीत प्रिंटर जप्त केल्याची अतिशय गंभीर  बाब समोर आल्याने खळबळ उडाली . मुर्तीजापुर  शहरातील नगर परिषद घरकुल हे घरकुल नव्हे तर अपराधाचे केंद्र बनत चालल्याचे दिसून येत आहे पोलीस विभागाने मुर्तीजापुर शहरातील काही भागांकडे गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे गुजरात येथून आलेल्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे पोलीस उपनिरीक्षक नकुल पंचाल व त्यांच्या टीमने मुर्तीजापुर येथे पोलीस स्टेशन मध्ये येऊन मुर्तीजापुर पोलिसांच्या मदतीने घरकुल मध्ये राहणाऱ्या रियाज गयासुद्दीन सैय्यद या आरोपीला मिळालेल्या माहितीवरून अटक केली.  त्याच्या जवळून रंगीत प्रिंटर जप्त केले. गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील संजली पोलीस स्टेशन मध्ये एका वांटेड आरोपीला दि.2/7/18 रोजी    पकडण्यात आले होते. त्याची कसून चौकशी केली असता त्याने मूर्तिजापूर येथील सदर आरोपीबाबत माहिती दिल्याने आज सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. गुजरात येथे याप्रकरणी दिलेल्या माहितीवरून सदर कारवाई करण्यात आल्याचे स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे पोलीस उपनिरीक्षक नकुल पंचाल यांनी सांगितले .या प्रकरणी आणखी धागेदोरे तपासात मिळण्याची शक्यता असून सदर आरोपी केव्हापासून बनावट नोटा छापत होता व ते कुठे कुठे पाठवून चलनात आणले जात होते  याबाबत माहिती  तपासात समोर येणार  असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्रातील इतर शहरात याचे धागेदोरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post