इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सकल मराठा समाजाच्यावतीने शासनाच्या विरोधात लोहारा तालुक्यातील आष्टामोड येथे दि.27 जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत सकल मराठा समाजाच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि,सकल मराठा समाजाच्यावतीने संपुर्ण महाराष्ट्रात 58 मुक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.या काढण्यात आलेल्या मुक मोर्च्याचे महाराष्ट्र शासनाने कसल्याही प्रकारची दाद घेतली नाही.व शासनाने मोर्च्याच्या मागण्याबाबत कोणताही विचार केला नाही.त्यामुळे लोहारा तालुक्यातील आष्टामोड येथे दि.27 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.राज्य सरकारने मागण्या मान्य नाही केल्यास या पुढे क्रांती ठोक मोर्चाचे आयोजन करण्यात येईल.होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील,असे निवेदनात म्हटले आहे.
