- मुरुम येथील बसव प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे यांच्या पाठपुराव्याला यश
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- मुरूम येथील मुरूम-भुसणी वाडी रोडवर स्थित शिव-मारुती मंदिर आहे.या मंदिरात दर शनिवारी व मंगळवारी दर्शनासाठी परिसरातील भुसणी,भुसणी वाडी, यकंटेकुर,मुरूम,अदि परिसरातील नागरिकांची गर्दी असते.व भुसणी वाडी येथील नागरिक या रस्त्याने पायी मुरूम ला ये जा करीत असतात.
सदरील मंदिर परिसरातील हातपंपात झाडांची मुळे खोलवर गेल्याने ते हातपंप बंद अवस्थेत असल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची सोय होत नव्हती.येथील नागरीकांची गैरसोय लक्षात घेवुन मुरुम येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी उमरगा तालुका आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याशी चर्चा केली व विंधन विहीरीची मागणी केली.तात्काळ आ.ज्ञानराज चौगुले यांनी नागरीकांची अडचण लक्षात घेवुन विंधन विहीर या कामासाठी 1 लाख रुपयाची निधी मंजुरीची शिफारस पत्र रामलिंग पुराणे यांना दिला आहे.या परिसरातील नागरीकांकडुन आ.ज्ञानराज चौगुले व सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
