इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे,व मराठा आरक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कायगाव ठोक येथील काकासाहेब शिंदे यांनी दि.23 जुलै रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यातील नदीपात्रात जलसमाधी घेतल्याबध्दल सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा,अशा विविध मागणीसाठी लोहारा सकल मराठा समाज मराठा क्रांती ठोक मोर्चा यांच्यावतीने दि.24 जुलै रोजी लोहारा शहर व तालुका
कडकडीत बंद करण्यात आले.
अशा विविध मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार रणजित शिराळकर यांना निवेदन देण्यात आले.
या बंदमध्ये लोहारा शहर,माकणी,कानेगाव,अदि गांवे सहभागी झाली होती.शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने शंभर टक्के बंद ठेवली होती.सर्व एस.टी.बसेस बंद होत्या.यामुळे शहरात दिवसभर शुकशुकाट दिसत होता.या निवेदनात म्हटले आहे कि,आर.बी.
समुद्रातील छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची एक इंचही कमी करण्यात येवु नये.कोपर्डी घटनेतील आरोपीना तात्काळ फाशी देण्यात यावी,
काकासाहेब शिंदे यांच्या किटुंबातील व्यक्तीना शासकीय नौकरी मिळावी व 50 लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी,मराठा समाजातील शासनाने केलेल्या घोषणाची अंमलबजावणी करण्यात आहे.अशा विविध मागण्या निवेदनात केल्या आहेत.
शहर व तालुक्याच्यावतीने शहरातील शिवाजी चौकात कै.काकासाहेब शिंदे यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी भास्कर माने,
दादासाहेब पाटील,संजय जाधव,केदारी पवार,अँड.
दादासाहेब पाटील,बाळासाहेब पाटील,शाम नारायणकर,बालाजी बिराजदार,प्रकाश भगत,गिरीश भगत,श्रीकांत भरारे,प्रशांत काळे,नेताजी शिंदे,सहदेव गोरे,उमेश गोरे,मोहन गोरे,अभिमान खराडे,किरण चिंचोळे,भरत पाटील,किरण मोरे,सचिन जाधव, लक्ष्मण रसाळ,शशीकांत पाटील,नितीन जाधव, सुखदेव सातपुते, बाबुराव घाडगे,गोविंद जाधव,अमोल सुर्यवंशी,सुशांत शिंदे,बाबुराव घाडगे,यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.या बंद काळात अनुचित प्रकार घडु नये यासाठी पो.नि.सर्जेराव भंडारे यांनी लोहारा तालुक्यात व शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
