इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- मुरूम-भुसणीवाडी,मुरूम-फुलसिंगनगर तांडा,भुयार चिंचोली-नाईक नगर व मुरूम परिसरातील जिल्हा परिषद बांधकाम विभाग हद्दीतील रस्त्या बाबत दि.24 जुलै रोजी मुरूम-भुसणी वाडी फाटा येथे बसव प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे यांनी ठिय्या आंदोलन केले.या आंदोलनास परिसरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रशासकीय दफतरी रामलिंग पुराणे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.या रस्त्याच्या कामा बाबत प्रशासन दखल घेत नसल्याने मुरूम-भुसणीवाडी फाटा येथे भुसणी वाडी रोड वरील खड्ड्याचे पूजन करून सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे यांनी या ठिय्या आंदोलनास सुरुवात केली होती.
या आंदोलनाची दखल घेत जि.प.बांधकाम विभाग उपअभियंता गुंड व उस्मानाबाद जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता जि प.बांधकाम विभाग यांची भ्रमण ध्वनि वरून संभाषण झाल्यानंतर व तसेच त्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास माघार घेण्यात आली.
ऑगस्ट महिन्याच्या जि.प.बांधकाम समितीच्या बैठकी मध्ये वरील विषय मंजुरी साठी ठेवून निधी उपलब्ध करून देण्यात आले.यावेळी जि.प.बांधकाम विभाग उमरगा शाखा अभियंता आर.सी.चव्हाण, अजय चिंचोले यांच्या मार्फत लेखी आश्वासन देण्यात आले.
या आंदोलनास नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
व तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे संतोष कलशेट्टी यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
भुसणीचे सरपंच महेश हिरमुखे,मुरूम येथील शेतकरी दिलीप स्वामी,माजी उपसरपंच संजय गायकवाड, माजी उपसरपंच परमेश्वर मंडले,ग्रा.प.सदस्य रविंद्र मंडले,यशालेय समिती अध्यक्ष कांतराव मंडले, चेअरमन अंबादास वासुदेव गोविंद मंडले,गणपती मंडले चंद्राम मंडले,कन्हैय्या भोसले,सतिश मंडले, राजू मुल्ला,रजनीकांत मंडले,सुधाकर भोसले,राम भोसले,राम मंडले,आपण्णा वासुदेव,मोहन वासुदेव, शिवशंकर मंडले,लक्ष्मण वासुदेव,यांच्यासह भुसणी वाडी येथील (बेरड वाडी) येथील समस्त नागरिक व शालेय विध्यार्थीनी सहभाग नोंदवला.यावेळी सहाय्यक पो.नि.मुस्तफा शेख यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
आंदोलने ही काळाची गरज — रामलिंग पुराणे
झोपलेल्या निगरगट्ट प्रशासनाला जागे करण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलने हे काळाची गरज आहे.वरील आस्वानंतर ही जर प्रशासन जाग नाही आली तर यापुढील काळात मोठे आंदोलन करण्यात येतील.या पुढील आंदोलन प्रशासनाच्या कार्यल्यासमोर व राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात येईल या अटीवर ठिय्या आंदोलन माघे घेण्यात आले आहे असे यावेळी रामलिंग पुराणे यांनी सांगीतले.

