इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- कृष्णा खोऱ्याच्या सुधारीत जलआराखड्यामध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी एकुण 23.66
अब्ज घनफुट (टी.एम.सी.) पाणी वापराची तरतुद करावी,अशी मागणी नागपुर येथील सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांनी सविस्तर मांडणी करुन शासनाचे लक्ष वेधुन घेतले.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा मराठवाड्यातील कायम दुष्काळी भागासाठी महत्वकांक्षी प्रकल्प असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे व भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या प्रयत्नामुळे
या प्रकल्पास केंद्रिय पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली आहे.व पहिल्या टप्प्यात 7 टी.एम.सी.पाणी मान्यता मिळुन या प्रकल्पाचे पुनर्जीवन झाले आहे.
कृष्णा खोऱ्यातील विपुल जलसंपत्ती असलेल्या अतिरिक्त 115 टी.एम.सी.पाणी कृष्णा खोऱ्यातील भिमा उपखोऱ्यामध्ये वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या अंतर्गत मराठवाड्याच्या कृष्णा खोऱ्यातील क्षेत्रास 21 टी.एम.सी.पाणी उजनी जलाशयातुन व 2.66 टी.एम.सी.पाणी सिना प्रकल्पाच्या खालील भागातुन असे एकुण 23.66 टी.
एम.सी.पाण्यासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प प्रथम मान्यता देण्यात आली.कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प प्रथम टप्पा 7.00 टी.एम.सी.,द्वितीय टप्पा 16.66 टी.एम.
सी.,असे एकुण 23.66 टी.एम.सी.याप्रमाणे पाणी नियोजन करावयाचे आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामुळे मराठवाड्यातील उस्मानाबाद व बिड जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यामधील एकुण 1,14,731 हेक्टर अवर्षणप्रवण क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
या अंतर्गत कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची प्रथम टप्प्यातील कामे 7.00 टी.एम.सी.मर्यादेमध्ये प्रगती पथावर आहेत.या योजनेस अनुज्ञेय असलेले द्वितीय टप्प्यातील 16.66 टी.एम.सी.पाणी मिळणे बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या अध्यक्षतेखाली दि.7 एफ्रिल 2015 रोजी झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले होते.