इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील जेवळी ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्त आयोगच्या 2017 2018 या वर्षाच्या निधीतून जलशुध्दीकरण व शितकरण यंत्र (आरओ) बसून नागरीकांना गेल्या तीन महिण्यापासून उल्पदरात थंड व शुद्ध पाण्याचे वितरण करुण्यात येत आहे.अल्पदरात थंड व शुद्ध पाणी उपलब्ध होत असल्याने नागरीकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.यामुळे नागरीकांच्या चांगल्या आरोग्य बरोबरच ग्रामपंचायतीला तीन महिण्यात पाऊन लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.
जेवळी येथे 19 ते 21 जुलै 2016 या काळात पार पडलेल्या आमचं गाव,आमचा विकास या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर वित्त आयोगाद्वारे मिळणाऱ्या निधीतून पुढील पंचवार्षिक विकास आराखड्याला मंजूर देण्यात आले.याच वेळी नागरीकाना शुद्ध पाणी अल्प दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देश्याने जलशुध्दीकरण यंत्र (आर ओ) बसविण्याचा ठराव घेताला होता.त्या अनुसार चौदाव्या वित्त अंतर्गत 2016 — 2017 या वर्षीच्या निधीतून 4 लाख 50 हजार रक्कमेचे जलशुध्दीकरण व शितकरण यंञा (आरओ) बसविण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मंजूरी देण्यात आली.जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागाने मिळालेल्या मंजुरीतील अटी व शर्तीच्या अधिन राहुन या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अॅनलाईन ई-टेंडर काढण्यात आले.पुणे येथील अक्वॅागार प्राव्हेट लिमिटेड इडस्टीज या कंपनीने पाच टक्के सुरक्षा रक्कम डीपॅाजीट व तीन वर्षाची वारंटी या अटीवर येथील बाजार संकुलनात हजार लिटर छमतेचे जलशुध्दीकरण यंत्र (आरओ) बसविण्यात आले आहे.या प्लॅंटचे शुभारंभ दि.18 एप्रिलला येथील मठाधीश गंगाधर महास्वमीजी यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्या शोभा तोरकडे व सरपंच मोहन पणुरे यांच्या उपस्थित झाला.आता येथील नागरीकाना चोवीस तास थंड व शुद्ध पाणी अल्पदरात उपलब्ध होत असल्याने नागरीका कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.येथील स्वयंम चलीत एटीएम यंत्रात पाच रूपये टाकल्यास वीस लिटर तर एक रुपये टाकल्यास दोन लिटर शुद्ध व थंडगार पाणी उपलब्ध होत आहे. येथील ग्रामपंचायतीने आरोग्याच्या दृष्टिकोणातू राबविण्यात आलेल्या या महत्वपूर्ण प्रकल्पाचा फायदा सर्व सामान्य नागरीकांन चांगला होत असून यामुळे यंदा पावसाळ्या अजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. खाजगी झार विक्रेत्यांना चांगला आळा बसला आहे. या बरोबरच या ग्रामपंचायतीला तीन महिण्यात देखभाल खर्च वजा जाता 75 हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.जेवळी गावची लोकसंख्या ही ज्यास्त व या बीट ग्राम पंचायतीत तांडा- वस्तीचाही समावेश असल्याने आणखीन एकादा जलशुध्दीकरण यंत्र किंवा घरपोंच सेवा राबवावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्यच्या दृष्टिकोणातून राबविण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे आता नागरिकांचे अजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.या बरोबरच नागरिकाकडून चांगला प्रतिसाद पाहून जेवळी येथील बसस्थानक परीसरात पाचशे लिटरचे आणखीन एक जलशुध्दीकरण यंत्र बसविण्याचे तसेच येथील ज्यास्तीत जास्त नागरीकापर्यंत हे शुद्ध पाणी वाहनाद्वारे घरपोच पोचवण्याचा आमचा मानस आहे. यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येत आहे.असे सरपंच मोहन पणुरे यांनी सांगीतले.
