हातात राशीचे खडे घालण्यापेक्षा डोक्यात पुस्तकाचे धडे घालणारा विद्यार्थी आयुष्यात झेप घेवु शकतो — व्याख्याते देवाजी चव्हाण


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- विद्यार्थ्यानी हातात राशीचे खडे घालण्यापेक्षा डोक्यात पुस्तकाचे धडे घाला.व कावळ्या सारखी नजर,
बगळ्यासारखे ध्यान,कुत्र्यासारखी झोप,अल्प अहार हे पाच लक्षणे लक्षात ठेवली तर विद्यार्थी मोठी झेप घेवु शकतो,असे प्रतिपादन व्याख्याते देवाजी चव्हाण यांनी केले.
लोहारा हायस्कुल शाळेत दहावी गुणवंत व शिष्युवत्ती परिक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्याचा दि.20 जुलै रोजी सत्कार करण्यात आला.या प्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.एन.पांचाळ,सुर्यकांत बगाडे,माजी मुख्याध्यापक टि.के.मक्तेदार,व्याख्याते देवाजी चव्हाण,जिल्हा मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,अदि,उपस्थित होते.
यावेळी दहावीत तालुक्यात प्रथम कु.प्रणिता सुर्यवंशी (99.20%),द्वितीय अजिंक्य सांळुके(95.20%),तृतीय
अकांक्षा छिद्रे(94.20%),शिवलिला जट्टे(92.60%),
रोहीणी काडगावे(90.80%),ऋतीक देशमुख,पल्लवी चव्हाण,स्वंराजली मुळे,शिवकन्या वचने,स्नेहल  पाटील,इरफान शेख,वैष्णवी मुळे व शिष्युवृत्ती परिक्षेत किरण सुतार,अजिंक्य सुतार यांना मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.
या दहावीतील परिक्षेत प्रथम क्रंमाकसाठी 500 रुपये व द्वितीयसाठी 300 रु व तृतीयसाठी 200 रु बक्षीस  सुर्यकांत बगाडे यांच्यावतीने देण्यात आले.हे बक्षिस प्रत्येक वर्षी देणार असल्याचे यावेळी सुर्यकांत बगाडे यांनी जाहीर केले.यावेळी विद्यार्थीनी पल्लवी चव्हाण व सुर्यकांत बगाडे,मुख्याध्यापक एस.एन.पांचाळ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सतिश जट्टे व सुत्रसंचालन विजय नागणे यांनी केले.तर आभार गोपाळ सुतार यांनी मानले.या कार्यक्रमास वसंत राठोड,विठ्ठल वचने पाटील,दयानंद पोतदार,दिलीप शिंदे,माधव हाणमशेट्टी,सदाशिव बचाटे,बाळासाहेब लांडगे, वैजिनाथ पाटील,सारीका चिकटे,निर्मला कोळी,शिल्पा साबणे,विद्या मक्तेदार,स्वाती माशाळकर,संजय  घोडके,प्रद्मुन देवकर,शिवराज शिदोरे,वैजिनाथ  होळकुंदे,सुरेश पांचाळ,शाम पोतदार,यांच्यासह
 पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post