इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- स्त्री शक्तीचा गौरव या उपक्रमा अंतर्गत सह्याद्रि फाउंडेशनच्यावतीने खामसवाडी येथील कु.मोक्षदा महादेव गर्जे यांनी राज्य लोकसेवा (MPSC) 2017 मध्ये घेतल्या परिक्षेत पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत (PSI) यश संपादन केल्या बद्दल यांचा सह्याद्रि फाउंडेशन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डाँ.दापके-देशमुख दिग्गज व सचिव डाँ.दापके-देशमुख वसुधा यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
तसेच जिल्हातील इतर मुलींनी गर्जे यांचा आदर्श घेवुन यश संपादन करावे असे मत डाँ.दापके-देशमुख यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमास बील गेट्स चे प्राचार्य अर्शद रजवी,पानसे मँडम,गजानन पाटील ज्ञानेश्वर गिरी,सोमेश्वर शिंदे,शैला टेळे,यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकते मोठ्या संख्येने उपस्थित होतेे.
