जैन राजनितीक चैतना मंच जिल्हाध्यक्षपदी रविंद बोरा तर सचिव पदी राजेश लोढा यांची नियुक्ती


यवतमाळ :- संपूर्ण विदर्भात जैन समाजाला राजकीय क्षेत्रात स्थान मिळावे या हेतूने संपूर्ण विदर्भात अग्रेसर झालेल्या जैन राजनितीक चैतना मंच च्या विदर्भाअध्यक्षा डॉ. सौ. रुचा जैन यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण विदर्भामध्ये झंझावत दौरा प्रारंभ असून त्यांच्या नियोजित यवतमाळ दौरा अंतर्गत सकल जैन समाजातील युवकांची एक बैठक अरिहंत प्लाय हॉऊस संकट मोचन रोड यवतमाळ येथे जैन राजनितीक मंच च्या विदर्भा अध्यक्षा सौ. डॉ. रूचा जैन यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा संपन्न झाली. त्या सभेमध्ये प्रामुख्याने विदर्भ जैन राजनितीक चैतना मंचचे महामंत्री रोहित भाई शहा, सचिव सौ. अनिता जैन व सकल जैन समाजाचे  धडाडीचे कार्यकर्ता डॉ. रमेश खिवसरा आवर्जून उपस्थित्त होते.


या प्रसंगी जैन राजतिनीक चैतना मंच जिल्हा कार्यकारिणी निवड्यात आली त्यामध्ये अध्यक्षपदी रविंद्र भवरीलाल बोरा उपाध्यक्ष पदी विजयकुमार बुंदेला, ऍड. विजय चानेकर तर सचिव पदी राजेश सुरेशचंदजी लोढा सह सचिव ललित कुमार कोटडीया, कोषाध्यक्ष सुनिल भरुड, सदस्य राजेश कोठारी, सौ. सरोजनी चावडे, रितेश भरुट, गिरीश सुराणा, नगर सेवक संदिप तातेड, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर डॉ. रमेश खिवसरा यांची संस्थेच्या विदर्भ  उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या नियुक्तीमुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय दृष्टीकोणातून सकल जैन समाज एकजुट होऊन राजकीय क्षेत्रात स्थान प्राप्त करण्याच्या दृष्टीने जैन समाज संघटीत होत आहेत. या नपव नियुक्त पदाधिकार्‍यांचे भारतीय जैन संघटना, यवतमाळ च्या वतीने  अभिनंदन करण्यात येत आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post