दहावीच्या परीक्षेतील गुणवंतांचे सृजन साहित्य संघ मुर्तिजापूर कडून कौतुक


 मूर्तिजापूर :- दहावीच्या परीक्षेत भरीव यश संपादन केल्याबाबत सृजन साहित्य संघ मुर्तिजापूरच्या वतीने गुणवंतांचे गुलाबपुष्प, मिठाई व भेटवस्तू देवून कौतुक करण्यात आले. यामध्ये कु. संस्कृती प्रशांत पंत, कु. अश्विनी संदीप वाकोडे, वेदांत किशोर आष्टीकर, कु.सायली सिरसाट, कु.साक्षी सिरसाट व कु.आश्लेषा सुनिल ढोकणे या विद्यार्थ्यांचे गृहभेटी घेऊन कौतुक करण्यात आले.या उपक्रमात कवी  रामकृष्ण आसरे, भड सर, प्रशांत पंत, प्रमोद पंत , शैलेष गिरी, गझलप्रतिष्ठानचे संस्थापक संदीप वाकोडे, विलास वानखडे,किशोर आष्टीकर सर, विष्णू लोडम व विनोद महल्ले ,रवींद्र जवादे हयांनी सहभाग दिला. विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.असे प्रसिद्धीप्रमुख विनोद महल्ले यांनी कळविले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post