यवतमाळ जिल्ह्यातील अंगणवाडी ना इमारत उपलब्ध करून द्या - मनसे



यवतमाळ :-  जिल्ह्यातील जवळपास ८० ते ९० अंगणवाडी ह्या इमारती शिवाय सुरू असून एकीकडे शासन डिजिटल इंडिया च्या जाहिराती करत असताना जिल्ह्यात शिक्षणाचा असा भोंगळ कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप मनसेने निवेदनातून जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी जलाल शर्मा यांना दिलेल्या निवेदनात केला.

यवतमाळ शहरा लगत मासोळी ;उमरसरा ;यासह इतर भागत अंगणवाडी चालविण्यासाठी इमारातच उपलब्ध नाही, नाईलाजास्तव त्यांना अंगणवाडी मंदिरात, घरात,पिठगिरणीत,लोकांच्या अंगणात ,भरवावी लागते तर दुसरीकडे शासन मोठ्या जाहिराती द्वारे जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करत आहे.पावसाळा सुरू झाला असून या परिस्थितीत या मुलांनी शिकायचे कुठे असा सवाल मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार,अनिल हमदापुरे यांनी केला असता शर्मा यांनी हा खूप गंभीर विषय असून लवकरच यावर प्रशासनाच्या वतीने पावले उचलली जातील याची शाश्वती दिली आणि मनसेचे या अतिशय संवेदनशील विषयावर घेतलेल्या भूमिके चे अभिनंदन करत जिल्ह्यातील इमारत नसलेल्या अंगणवाडी ची माहिती मनसेला देण्याची विनंती केली जेणे करून या विषयाचे वास्तव समोर येईल.

 या प्रसंगी अनिल हमदापुरे यांनी शालेय पोषण आहारातील अनियमितता बाबत शाळेला कल्पना न देता  मुख्यकार्यकारी अधिकारी याना अंगणवाडी भेटी देण्याची विनंती केली.जेणे करून शासनाच्या योजनेचा फायदा हा खऱ्या गरजवंताला मिळेल व शासनाचा माल हा काळ्या बाजारात विकल्या जाणार नाही.

तसेच अमृत आहार योजनेची ही माहिती अंगणवाडी तुन मागवावी जेणे करून कागदोपत्री नोंदी होणार नाही अश्या स्वरूपाची मागणी या प्रसंगी करण्यात आली या प्रसंगी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार,मनवीसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे, मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष साजिद अब्दुल रहमान,शहर उपाध्यक्ष दिपक आडे,विकास पवार, कैलास ढोके, छबुताई आठवले,सुनीताताई पारखी, सुमित्राताई मोहिते,मंगलाताई पवार,अजय गोडबोले यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post