लोहारा येथील बसवेश्वर मंदिरात राष्ट्रसंत प.पु.डॉ.शिवलिंग शिवाचार्य यांचा सत्कार संपन्न


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील बसवेश्वर मंदीरात दि.19 जुन रोजी दुपारी राष्ट्रसंत प.पु.डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना वसुंधरा पुरस्कार मिळाल्याबद्दल विरशैव लिंगायत समाज व बसव प्रतिष्ठानच्या वतीने गौरव सोहळा व दहावी,बारावीतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला
 यावेळी प्रमुख म्हणुन  माजी आमदार सि.ना.आलुरे गुरूजी, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकील, पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकांत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे  संचालक शंकर जट्टे,भगवंत बाबा पाटील,नगरसेविका ज्योती मुळे निर्मला स्वामी सिमा लोखंडे,विठ्ठल वचने पाटील,शिवा स्वामी,शरण्णाप्पा कबाडे,हरी लोखंडे,
अदि उपस्थित होते.यावेळी सि.ना.आलुरे गुरूजी, भगवंत बाबा पाटील यांची भाषणे झाली.यावेळी पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.शिवलिंग महाराज यांचा सत्कार सि.ना.आलुरे गुरूजी यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक नागण्णा वकील व सुत्रसंचालन संध्या बडुरे व सतिश जट्टे यांनी केले.तर आभार सचिन तोडकरी यांनी मानले.यावेळी प्रकाश होंडराव, प्रकाश तोडकरी,नरसिंह पाटील,राजु जट्टे,वैजिनाथ जट्टे,अनिल जट्टे,मंगेश बनशेट्टी,महेश कुंभार,गणेश कमलापुरे,महेश कुंभार,दीपक मुळे,संजय दरेकर, गणेश पालके,यांच्यासह नागरिक मठ्यया संख्येेेेने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post