अखेर न्याय मिळाला.मुरूम पोलीस चौकी निवासस्थान ड्रेनेज कामास मंजुरी..


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील मुरूम पोलीस चौकी हद्दीत कर्मचारी निवासस्थान नवीन बांधकाम झाले असले तरी,ड्रेनेज चे व्यवस्था न केल्यामुळे,सांडपाणी उघड्यावर थांबत होते,त्यामुळे बाजूच्या वस्तीतील नांगरिकाना त्या पाण्याच्या,दुर्गंधी चा त्रास सोसावा लागत असे.


तसेच पाण्याचा जिरपा होत नसल्याने पाणी आजू-बाजूच्या घरात शिरत होते.त्यामुळे थांबलेल्या पाण्यामुळे मच्छर चा ही पादुर्भाव वाढला आहे.याची दखल घेऊन बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे यांनी दि.14/3/
2018 रोजी जिल्हाधिकारी व तहसीलदार उमरगा यांना याबत तक्रार नोंदविली होती,तहसीलदार यांनी तात्काळ दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागास सांडपाणी व्यवस्था साठी आदेश दिले.
संबधीत विभागांनी दखल घेऊन अखेर जून मधे या कामास दोन लाख सत्तर हजार रुपयांची मंजुरी मिळाली.वरील मंजुरी मुळे लवकरच परिसरातील नागरिक व पोलीस कर्मचारी दुर्गंधी चा व इतर त्रासाचा सुटका मिळेल.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post